YAYATI (Marathi)

Notes & Highlights

YAYATI (Marathi)

प्रत्येक मनुष्य आयुष्याच्या शेवटी थोडासा शहाणा होतो; पण तो दुसऱ्याला लागलेल्या ठेचांनी नाही, तर स्वतःला झालेल्या जखमांनी.

मागे किर्र रान, पुढे गर्द अरण्य, असे आहे हे जीवन! अज्ञाताच्या अंधकारात तर ते अधिकच भयाण भासते.

कुठल्या तरी चांदण्याचा मिणमिणणारा प्रकाश अधूनमधून या अरण्यातल्या पाउलवाटेपर्यंत येऊन पोचतो. या पायवाटेवरून होणाऱ्या माणसाच्या प्रवासाला आपण जीवन म्हणतो.

आयुष्याच्या आरंभी ज्यात काही अर्थ नाही, असे वाटते, त्यातच खोल अर्थ भरलेला आहे, असे आयुष्याच्या शेवटी आढळून येते.

कळी सदैव कळी राहू शकत नाही. आज ना उद्या तिला फुलावेच लागते, मोठे व्हावे लागते.